Rajmudra IT - शासकीय योजना
1- एकदिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांच्या पिलांचे गटवाटप
सन २०१९-२० था आर्थिक वर्षसाठी जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास योजना जिल्हात राबविण्यात येणार आहे, या योजनेत निवड झालेल्या लाभाथ्यांना १०० एक दिवसीय कुक्कुट पिल्ले, त्यासाठीलागणारे खाद्य यासाठी अनुदान दिले जाणार आहे. योजना प्रती लाभार्थी रु. १६००० ची असून ५० टक्के शासकीय अनुदान व ५० टक्के लाभार्थी हिस्सा, असे योजनेचे स्वरुप आहे.ही योजना सर्वसाधारण आहे. ती सर्वांसाठी खुली आहे. छोट्या प्रमाणात कुक्कुटपालन करून त्यापासून उत्पन्नाचे साधन निर्माण करणे हा योजनेचा उदेश आहे.
या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रवर्गांतील लाभार्थींना ५० टक्के अनुदानावर प्रति लाभार्थी एकदिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांच्या (आरआयआर, ब्लॅक ॲस्ट्रॉलॉर्प, गिरिराज, वनराज, कडकनाथ व इतर शासनमान्य जातीचे पक्षी) १०० पिलांचे गटवाटप करण्यात येते. एका गटाची (१०० एकदिवसी पिलांची) एकूण किंमत १६,००० रुपये मंजूर करण्यात आली आहे.
एका गटाच्या खर्चाचा तपशील -
एकदिवसीय १०० पिलांची किंमत २,००० रु.
प्रत्येक गटाबरोबर द्यावयाचे खाद्य ८०० किलो १२,४०० रु
वाहतूक खर्च १०० रु.
औषधे १५० रु.
रात्रीचा निवारा १,००० रु.
खाद्याची भांडी ३५० रु
एकूण - १६,००० रु.
लाभार्थी निवड -
जिल्ह्यातील १० ही तालुक्यांतून या योजनेसाठी अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि) पं.स.पशुवैद्यकीय दवाखान्या कडून उपलब्ध करून घ्यावेत. विहित अर्ज २० जुलै ते१९ ऑगस्ट कालावधीत संबंधित पशुधन विकास अधिकारी (वि) पं. स. नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जमा करावेत. लाभार्थ्यांची निवड पात्र अर्जामधुन सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे त्यामुळे २० ऑगस्टनंतर प्राप्त होणाऱ्या किंवा अपुर्ण अर्जाच्या निवडीचा सोडतीसाठी विचार केला जाणार नाही.
2 - शासनाच्या वतीने राज्यातील ग्रामीण भागात, रोजगार निर्मिती व कुक्कूटपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी ही वैयक्तिक लाभाची योजना 2013 पासून राबविली जात आहे.
योजनेसाठी प्रमुख अटी :-
▪सर्वसाधारण अर्जदाराकडे 3 गुंठे, अनूसूचित जाती / जमातीच्या अर्जदाराकडे 1.5 (दीड) गुंठे मालकीची अथवा भाडेपट्टीची जागा.
▪अर्थसहाय्यातून उभारलेले कुक्कूटगृह हे कुक्कूट पालनासाठीच वापरणे बंधनकारक.
▪पक्षीगृहाचे बांधकाम आराखडयाप्रमाणे असावे.
▪अर्जदाराचे कुटुंबात कोणीही शासकीय नोकरीला नसावे.
लाभाचे स्वरूप :-
✅ प्रकल्पाची एकुण किमंत रु. 2 लाख, 25000/-
✅सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान
✅ अनूसूचित जाती / अनूसूचित जमातीसाठी 75 टक्के अनुदान
आवश्यक कागदपत्रे :-
▪ओळखपत्राची सत्यप्रत
▪7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8
▪प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
▪जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
▪रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची प्रत.
▪अपत्य दाखला (ग्रामपंचायतचा)
▪रहिवासी दाखला
संपर्काचे ठिकाण :- अर्जदार राहत असलेल्या भागातील पशुवैद्यकिय दवाखाना व पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
- अधिक माहितीसाठी संपर्क -
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट - https://ah.mahabms.com/webui/home
इ-मेल - ah@mahabms.com
मोबाईल नंबर :- +91 8554882178
+91 9307631228

1 Comments
good infarmation
ReplyDelete