महिमापुर ची ऐतिहासिक सात मजली पायरीविहिर, अमरावती
स्थापत्यशैलीचा अजोड व अनोखा नमुना असलेली हि विहीर मोघल कालीन असून कुण्या राजाने पाणी टंचाई वर मात करण्या साठी बांधली असावी, विहिरीत खजिना दडलेला आहे अश्या अनेक दंतकथा या विहिरीबाबत प्रचलित आहेत, अमरावती जिल्ह्यात दर्यापूर पासून आसेगाव मार्गावर साधारणतः 30 किमी अंतरावर माहिमापूर हे छोटेखानी गाव आहे.
ही विहीर कमी आणि राजाचा राजवाडाचा पाहतांना दिसते या विहीरीला 12 दरवाजे आहेत आत मध्ये जायला विहिरीचे कोरीव काम ऐवढे अद्भुत आहे की बघून थक्क व्हाल विहीरीच्या भिंतीवर तथागत आणि पिंपळाचे पाने कोरलेले आहे हि जल देवता सुरवातीच्याच काहि पायर्या ओलांडल्यावर विहिरीच्या भिंतीवर आढळते... जल देवता पालखट घालुन बसलेली आहे, व दोन्ही हाथ जोडलेले आहेत व त्यात जलकुंभ सारखे पात्र आहे... विहिरीचा उद्देश्य उपराई च्या फकिर शाद्दल बुआची दर्गा च्या वाटकर्यासाठी पीण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे व निवारा हाच होता. हि विहिर उपराई ते अचलपुर या मार्गावर पडते.
माहिती साभार
प्रशांत देशमुख
एकदा अवश्य भेट द्या माहिती आवडल्यास नक्की शेयर करा
0 Comments