जुन्नर परिसरातील " सातवाहन कालीन " विटा.
जुन्नर परिसरातील सातवाहन कालीन बांधकामातील विटा पक्क्या भाजलेल्या असून बांधकामातील भितीच्या विटा एकावर एक जोड येणार नाहीत अशा सांधा मोड पध्दतीने ठेवलेल्या असून या शिवाय खालच्या विटा आडव्या तर वरच्या विटा उभ्या या पध्दतीने उभारल्यामुळे बाधकामातील भित भक्कम असायची. जुन्नर येथील उत्खननात आढळून येणाऱ्या विटा आकाराने मोठ्या म्हणजे साधारण पणे ४२ इंच लांब, २० इंच रुंद आणि ७ इंच जाडीच्या तर काही विटा त्याहूनही मोठ्या असल्याचे दिसून येते. जुन्नर परिसरातील उत्खननात सातवाहन कालीन थरांत अशा पक्क्या स्वरुपाच्या मानवी वस्तीस्थानाचा पुरावा आढळून येतो. अशा प्रकारच्या पक्क्या विटा पैठण, कऱ्हाड, नाशिक, नेवासे येथील सातवाहन कालीन थरात आढळलेल्या आहेत.
जुन्नर येथील अंगर गावात सन २००८, २००९ मध्ये डेक्कन काँलेज पुणे , पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खनना मध्ये घराच्या भितीची रचना , बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या विटाचे अवशेष पाढरी माती असलेल्या जमिनीत आढळले. त्यात ओबड - धोबड दंगड बसवून तयार केलेला एका घराचा तीन थराचा पाया आढळला.त्या विटांची भिंत साधारण पणे २२ फूट लांब असलेली आढळली.हि भिंत उभारताना सातवाहन कालीन विटाचे जोड एकावर एक येऊ नये यांची काळजी घेतली जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
जुन्नर मधील दिल्ली पेठ येथे सन २०११ मध्ये केलेल्या उत्खननात भाजलेल्या विटाचा वापर करुन एका शेजारी एक असलेली बांधकामे येथे आढळून आली असून चौरस आकाराचे उंच हौद असे वर्णन करता येईल अशी विटाची तीन बांधकामे आढळून आली होती. त्यातील उभ्या भितीमध्ये त्यांना कुठेही लहान दार नाही. मातीने सपाट केलेला तळ असलेल्या या एका हौद सद्दश्य विटाच्या बांधकामाची साधारणपणे लांबी २.५ मीटर तर रुंदी १.५ मीटर, उंची ३.१५ मीटर असल्याचे आढळून आले आहे.तसेच जुन्नर परिसरात राहणाऱ्या गृहस्थाने आपल्या घराच्या बांधकामात आधुनिक विटा व दंगड यांच्या वापराबरोबर सातवाहन कालीन विटांचाही वापर केल्याचे आज माझ्या संशोधनातून सिद्ध झाले.
--- बापुजी खंडू ताम्हाणे, ( जुन्नर )
प्राचीन इतिहास अभ्यासक
मों. नं. 9730862068
0 Comments