एक जीर्ण झालेला वाडा कवीता

श्री भूषण लक्ष्मण मडके यांची पोष्ट, मी फ़क्त ती आपण सर्वांपर्यंत पोहचवत आहे.

🏠🏠 वाडा 🏠🏠
दूरदेशी गेली पाखरे, 
चिमण्याही उडून गेल्या,
नशीबी मात्र माझ्या 
राहिल्या मनाच्या चिरफळ्या.
नाही रे सहन होत हा एकटेपणा
कुठूनतरी धावत या ना मुलांनो,
ऐकुद्या पुन्हा एकदा तो किलबिलाट पाखरांनो. 

माझा पण काय रुबाब होता
दारी आलेला याचक कधीच मोकळा जात नव्हता,
डहाळज मध्ये पानसुपारीची बैठक बसायची,
अन् माजघरात बायकांची बोलणी रंगायची. 
दिवस कसा आनंदाने फुलून जायचा
अन् रात्र हळूच बंगड्याच्या नाजूक 
किणाकिणीत  हरवून जायची.

प्रत्येक सणात आनंदाने न्हावून जायचो, 
कधी कधी तर मी माझाच हेवा करायचो.
संकटकाळात तर सगळ्यांना माझाच आधार वाटायचा,
पावसाने ओल झाली की माझाच सोफा असायचा.
आता मात्र मलाच आधार हवासा वाटतोय,
सुर्यालाच आता काजवा शोधावा लागतोय.
असा हा एकटेपणा मला आतून पूर्ण खावून टाकतोय.

आता ना कसला रुबाब आहे ना कसली ऐट आहे,
कसाबसा मीच तग धरून उभा आहे.
आलीच आठवण कधी पाखरांनो,
धावत या पुन्हा एकदा भेट देण्या चिमण्यांनो.
नाही रे सहन होत हा एकटेपणा,
कुठूनतरी धावत या ना मुलांनो,
ऐकुद्या पुन्हा एकदा तो किलबिलाट पाखरांनो. 

दूरदेशी गेली पाखरे, 
चिमण्याही उडून गेल्या,
नशीबी मात्र माझ्या 
राहिल्या मनाच्या चिरफळ्या.
नाही रे सहन होत हा एकटेपणा,
कुठूनतरी धावत या ना मुलांनो
ऐकुद्या पुन्हा एकदा तो किलबिलाट पाखरांनो.

                              धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

      एक जीर्ण झालेला वाडा आपले मनोगत माझ्या कवितेतून व्यक्त करत आहे.
     अशा वाडा पद्धतीच्या घरांमध्ये जन्म घेतला आहे आणि बालपण घालवलं आहे अशा सर्वांना ही कविता समर्पित.

भूषण कौशल्या लक्ष्मण मडके

#व्हॉट्सअप८२०८२१४१७९

Post a Comment

0 Comments