दुर्लक्ष केल्यास कर्जमाफीचा लाभ न मिळण्याची शक्यता
बीड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ अंतर्गत बीड जिल्ह्यातील ९,८४० विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या लाभार्थींनी अद्याप ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन त्यांचे आधार प्रमाणीकरण केलेले नाही. सदर विशिष्ट क्रमांक धारकांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. सदर लाभार्थींनी त्यांचे आधार कार्ड, विशिष्ट क्रमांक व बचत खाते पासबुक यासह त्वरित जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेण्याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण प्रलंबित शेतकऱ्यांच्या यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जे विशिष्ट क्रमांक धारक लाभार्थी मयत झाले आहेत, त्यांचे वारसांनी ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे, अशा बँक शाखेशी आवश्यक कागदपत्रांसह तत्काळ संपर्क साधून मयताचे नावावरील कर्ज वारसांचे नावे वर्ग करून घेण्याची कारवाई करून घ्यावी. जे विशिष्ट क्रमांक धारक लाभार्थी दि. १५ ॲाक्टोबर २०२० पर्यंत आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रावर जाऊन त्यांचे आधार प्रमाणीकरण करणार नाहीत, त्यांना कर्ज माफीचा लाभ न मिळाल्यास त्यास ते स्वत: वैयक्तिक जबाबदार राहातील.
बीड जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण प्रलंबित शेतकऱ्यांच्या यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Source : Vivek Sindhu News

0 Comments