सरकारच्या निर्णयाने करू शकाल या व्यवसायात मोठी कमाई, फक्त ५० हजारात करा सुरु !

देशातल्या सर्वच राष्ट्रीय महामार्गांवर १५ डिसेंबर पासून टोल प्लाझा वरून जाणाऱ्या गाड्यांवर फास्टॅग लावणे बंधनकारक केले गेले आहे. केंद्र सरकार च्या ह्या निर्णयामुळे फक्त डिजिटल ट्रान्सक्शनलाच मदत नाही तर प्रदूषण कमी होण्यापासून ते टोल वर लांबलचक रांगेत वाट बघण्यापासून पण सुटका होईल. ह्यामध्ये तुम्हाला पण एक चांगली संधी आहे केंद्र सरकार च्या ह्या निर्णयाचा लाभार्थी बनून व्यवसाय करण्याची.
काय आहे फास्टॅग ?
चला जाणून घेऊया फास्टॅग काय आहे आणि कसं काम करतं? खरंतर फास्टॅग एक टोल गोळा करण्याचे तंत्रज्ञान आहे जे राष्ट्रीय महामार्गावर टोल प्लाझा वर उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान रेडियो फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन प्रणाली वर काम करते. ही प्रणाली बार कोड तंत्रज्ञानापेक्षा चांगली असली तरी थोडी महाग आहे. हे रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅग्स खराब होत नाहीत आणि निघूनही जात नाहीत. फास्टॅग ला वाहनांच्या विंडस्क्रीन वर लावले जाते कारण टोल प्लाझा वरचा सेन्सर ह्याला स्कॅन करू शकेल. जेव्हा कोणते वाहन टोल प्लाझा वर फास्टॅग लेन वरून निघून जाते तेव्हा तो ऑटोमॅटिक स्कॅन होऊन योग्य तो टोल भरला जातो. ह्या साठी वाहनाला थांबावे लागत नाही. एकदा तयार करून घेतलेला फास्टॅग पुढचे पाच वर्ष चालतो. फास्टॅग सध्या देशात राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग मिळून १८० टोल प्लाजांवर कार्यरत आहे.

कसा करू शकाल व्यवसाय?
ज्याला मार्केट मध्ये काम करण्याचा अनुभव असेल असा कोणताही भारतीय नागरिक ह्यासाठी आवेदन करू शकतो. पण त्या लोकांना खास प्राधान्य दिले जाईल जे सध्या RTO एजन्ट, कार डीलर, कार डेकोर, ट्रान्स्पोर्टस, पुच सेंटर, फयूलिंग स्टेशन, इन्शुरन्स एजन्ट, पॉईंट ऑफ सेल एजन्ट इत्यादी म्हणून काम करत आहेत. ह्या साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.किती गुंतवणूक करावी लागेल?
फास्टॅग चा पॉईंट ऑफ सेल एजन्ट बनण्यासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टींची गरज लागेल. सर्वात आधी तुम्हाला संगणकाचे दयान असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे कमीतकमी एक संगणक, एक प्रिंटर आणि एक बायोमेट्रिक डिवाइस असला पाहिजे. बरोबरच तुमच्याकडे ५० हजार रुपयांची गुंतवणूक करण्याची क्षमता असली पाहिजे.
ह्यांना विकू शकता फास्टॅग!
देशात चालणाऱ्या चारचाकी किंवा त्यापेक्षा जास्त वाहनांना फास्टॅग लावणं बंधनकारक आहे. तुम्ही अशा वाहनांना फास्टॅग विकून पैसे कमावू शकता. फास्टॅग लावणे बंधनकारक केल्यामुळे ह्या फास्टॅग ला सध्या प्रचंड मागणी आहे. फास्टॅग विकणाऱ्या एजन्ट्स ची कमतरता असून आहेत त्या एजन्ट्स कडे ही फास्टॅग अपुरे पडत आहेत. त्यामुळे नागरिकांची सुद्धा गैरसोय होत असून लवकरच फास्टॅग पुरवले जातील अशी आश्वासनं मिळत आहेत. ह्या मागणीचा फायदा घेऊन तुम्ही सुद्धा हा व्यवसाय सुरु करू शकता. ह्या संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही FasTag च्या वेबसाईट ला भेट देऊन आवेदन देऊ शकता. https://fastag.brokerage-free.in/ वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे लिंक क्लिक करा. माहिती महत्वाची वाटल्यास इतरांशीही शेयर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा.

Post a Comment

0 Comments