एक मराठा दुसऱ्या मराठ्याचा विरोध करतोय


एक गुजराती दुसऱ्या गुजरात्याची ओळख पुसायला बसलाय आणि त्यासाठी दुसरा गुजराती मदत करतोय आणि तिसरा गुजराती पैसा पुरवतोय.
#गांधी-#मोदी-#शहा-#अंबाणी
एक मराठा दुसऱ्या मराठ्याचा विरोध करतोय आणि बाकीचे मराठा त्याच्या पाठी मागे मागे दुसऱ्याच मराठ्यासोबत निघाले आहेत.
#पवार-#पाटील-#पाटील-#पाटील-#दानवे- आणि खंडीबर मराठे
एक दलित दुसऱ्या दलितला दलाल बोलतो तोच दुसऱ्या दिवशी आम्ही तुमची इज्जत करतो म्हणून खालच्या सुरात शिव्या देतो मग दुसरा दलित दीर्घ कविता करतो मग सगळे दलित मिळून वेगळच काहीतरी करतात.
#आंबडेकर-#आठवले-#शिंदे-#उरलेलेवंचित आणि अजून खूप सारे वंचीत
एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाला म्हणतोय ही जन्नत माझी आहे जन्नतसाठी मी काही करेन, पैगंबरांनी म्हटलं आहे इथे कोणाचाच काही नाही फक्त निसर्ग मालक आहे.
#फारूक-#उमर-#मेहबुबा-#गिलानी- #मसरत आणि खंडीबर फुटीरवादी
एक अण्णा दुसऱ्या अण्णाला ईडली देतो तिसरा अण्णा त्याच्या बापाला उडवून सगळ्यांनी चटणी करतो मग त्या मेलेल्या बापाचा पोरगा रजनीकांत स्टाईल मध्ये येतो आणि मग सगळ्या अण्णांचा सांबर करून सोडतो.
#NTR #KCR #YSR अजून खंडीबर अण्णा
एक सरदार दुसऱ्या सरदारांची दाडी कुरवाळतो मग दुसरा सरदार येऊन वेगळीच बॉलिंग करतो त्यात दुसरा सरदार येतो तो बोलतो 82 आठवा, 84 आठवा, 86,87,88 करून सोडतो अस करून सगळे सरदार एकमेकांचा संता बंता करून टाकतेत.
#बादल-#कॅप्टन-#सिद्धू आणि खूप सारे संता बंता
काल देव भेटला होता ऍपलच्या शोरूम मध्ये 11 प्रो घेण्यासाठी आला होता मला बोलला वाचलास तू जे माझ्या गॅंग मधी आला यांच्यात गेला असतास ना तर फाटलेल्या सतरंज्याची खादी शिवून नेसावी लागली असती.
कळलं का खा पोहे आणि वड चहा आता.
हाना कॉपी पेस्ट काही हरकत नाही

Post a Comment

0 Comments