प्रधानमंत्री किसान मानधन योजना CSC PMKMY Scheme 2019

CSC PMKMY Scheme 2019 


CSC PMKMY Scheme 2019 in Marathi 

प्रधानमंत्री किसान मानध योजना ही भारत सरकारची एक योजना आहे. या योजने अंतर्गत 15000 रु. पेक्षा कमी मासिक उत्पन्न असणार्या सर्व शेतकऱ्यांना दर महा 3000/- रु. थेट शेतकऱ्यांचा बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये PMKMY योजनेविषयी संपूर्ण माहीती पाहणार आहोत. जसे की, या साठी कोण - कोणते कागदपत्रे लागणार आहेत, कुठे आणि कसा अर्ज करायचा आहे, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेचा कशाप्रकारे लाभ घेता येईल, यावर आपण चर्चा करणार आहोत.

Pradhanmantri Kisan Mandhan Yojana या विषयी 

केंद्र सरकारने नवीन योजनेनुसार शेतकऱ्यांचा वृध्दावस्थेत त्यांची निव्रत्ती म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना जसा PF मिळतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील याचा लाभ घेता यावा यासाठी याची सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजने अंतर्गत देशातील 5 करोड शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पुर्ण झाल्यानंतर दरमहा 3000/- रु. पगार थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. आणि जर काही कारणास्तव लाभार्थी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीला दरमहा 1500/- रु. पगार शेवटपर्यंत मिळणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना दरमहा प्रिमियम भरावा लागणार आहे. जेवढा प्रिमियम शेतकरी भरणार तितकाच हिस्सा सरकार देखील शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जमा करणार आहे.

पात्रता (Elegibility for PMKMY Scheme)


योजने अंतर्गत 15000 रु. पेक्षा कमी मासिक उत्पन्न असणारे सर्व शेतकरी ज्यांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे ते आॕनलाईन किंवा आॕफलाईन अर्ज करु शकतात. या योजनेसाठी ०९ आॕगष्ट पासुन अर्ज चालु झालेले आहेत.

आवश्यक कागदपत्रे (Documents for pmkmy scheme)

CSC PMKMY Scheme 2019 अंंतर्गत पात्र सर्व शेतकऱ्यांना या योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
               १) मोबाइल नंबर
               २) आधार कार्ड
               ३) बँक अकाऊंट ( बँकेत मोबाईल नंबर लिंक         असने आवश्यक आहे.)

कुठे करणार अर्ज ( How to apply online for pmkmy scheme)

प्रधान मंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्याची पात्रता असणारे सर्व शेतकरी आपल्या जवळील CSC सेवा केंद्रात जाऊन आॕनलाईन नोंदणी करु शकतात.
या योजनेच्या आॕनलाईन अर्जासाठी तुम्ही या लिंक चा देखील वापर करु शकता -
https://pmkmy.gov.in

Pmky Helpline Number

या योजनेविषयी अधिक माहीतीसाठी आपल्या जवळच्या CSC केंद्राला भेट द्या किंवा १८००-१८०-१५५१ या नंबर वरती काॕल करुन माहीती घेऊ शकता व तक्रार करु शकता.

Post a Comment

2 Comments

  1. hello,
    Your Site is very nice, and it's very helping us this post is unique and interesting, thank you for sharing this awesome information. and visit our blog site also
    7StarHD

    ReplyDelete