Face App वापरताय मग हे पहा...


🚨 FaceApp : सावधान
🚹 सोशल नेटवर्किंगवर सध्या चर्चा आहे ती फेसअॅपची. तुमच्या फ्रेण्डलीस्टमधील मित्रांचा म्हतारपणातील अवतार दाखवणाऱ्या या अॅपची सध्या नेटकऱ्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.
🚹 २०५० मध्ये एखादी व्यक्ती कशी दिसेल हे सध्याच्या फोटोंवरुन दाखवणाऱ्या या अॅपने सामन्यांपासून ते सेलिब्रिटीजलाही वेडं लावलं आहे.
*📌 धक्कादायक नियम :*
🚹 या अॅप संबंधित धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल करणाऱ्या अनेकांचे फोटो आणि मोबाइलमधील डेटा कंपनीच्या मालकीचा झाल्याचे वृत्त अमेरिकेतील अनेक वृत्तपत्रांनी छापले आहे.
🚹 तसेच या अॅप्लिकेशनच्या अटी आणि नियमही खूपच धक्कादायक असल्याचे अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
🚹 ‘फोर्ब्स’ने दिलेल्या वृत्तानुसार १५ कोटीहून अधिक लोकांचा डेटा आता ‘फेसअॅप’ची मालक कंपनी असणाऱ्या ‘वायरलेस लॅब्स’ या रशियन कंपनीकडे आहे.
🚹 युझर्सच्या मोबाइलमधील खासगी माहिती आणि ओळख सांगणारा सर्व डेटा या मोफत मिळणाऱ्या अॅप आणि फिल्टरच्या माध्यमातून कंपनीच्या सर्व्हरवर अपलोड झाला असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
🚹 ‘तुम्ही फेसअॅपला परवानगी देत आहात. तुमच्या माहितीचा वापर, पुनरुत्पादन, सुधारणा, प्रकाशित करण्याचे हक्क, भाषांतर करणे, कोठेही हा डेटा वितरित करणे, सार्वजनिकपणे प्रदर्शन करणे हे सर्व हक्क कंपनीकडे असतील.
🚹 युझर्सचे नाव, युझरनेम किंवा सोशल नेटवर्किंगवर त्यांची आवड निवड यासंदर्भातील सर्व माहिती सध्या अस्तित्वात असणाऱ्या किंवा भविष्यात निर्माण होणाऱ्या कोणत्या प्रकराच्या माध्यमांमध्ये, वाहिन्यांवर वापरण्याचा हक्क कंपनीकडे आहे.
🚹 ही माहिती वापरण्यासाठी कंपनी युझर्सला कोणत्याप्रकराचे मानधन किंवा मोबदला देणार नाही.
🚹 हे अॅप वापरुन युझर्स जेव्हा एखादी पोस्ट तयार करतात तेव्हा त्यांची माहिती (युझरनेम, लोकेशन आणि प्रोफाइल फोटो) कंपनीकडे आहे आणि ही माहिती सार्वजनिकपणे सर्वांना उपलब्ध होऊ शकते याची युझरला कल्पना आहे
🚹 ‘जेव्हा तुम्ही फेसअॅप डाऊलोड करता तेव्हा तुम्ही अॅपची मालकी असणाऱ्या रशियन कंपनीला तुम्ही अपलोड केलेला फोटो कसाही कधीही वापरण्याची परवाणगी देता.
🚹 तुम्ही एकदा हे अॅप इन्स्टॉल करुन आपली प्रोफाइल तयार केली तर तुम्ही ती कधीच डिलीट करु शकत नाही.


Post a Comment

0 Comments