Rajmudra IT | माहीती
आजच्या काळात सर्वात महत्वपूर्ण ओळख पत्र म्हणून आधार कार्डची ओळख आहे. कोणतेही काम असले की आधार कार्डची छायाप्रत मागितली जाते. अगदी छोट्या-छोट्या कार्यालयीन कामासाठी आधार कार्डची गरज भासते. सरकारने आधार कार्डला पॅन कार्ड सोबत लिंक करणे बंधनकारक केले आहे. जर तुमचा आधार कार्ड हरवला तर खूपच पंचायत होते. जर तुमचा आधार कार्ड हरवला असेल तर खूप सोप्या पद्धतीत तुम्ही तुमचा आधआर कार्ड पुन्हा मिळवू शकता.
राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे आता आधार कार्ड काढण्याची तात्पुरती केंद्रे मोठ्या प्रमाणात आढळून येत नाहीत. त्याऐवजी कायमस्वरुपी केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रांमध्ये जाऊन आपण आधार नोंदणी करू शकतो.
नोंदणी प्रक्रिया :-
आधार कार्ड नोंदणीसाठी आवश्यक अर्ज पूर्ण भरून नोंदणी केंद्रावर पूर्वनिश्चित वेळी किंवा इतर वेळी जाऊन जमा करावा. हा अर्ज http://uidai.gov.in/ या वेबसाइटवर किंवा नोंदणी केंद्रावर मोफत उपलब्ध आहे. याचठिकाणी नोंदणी केंद्रांची यादीही मिळेल. सर्वसाधारणपणे ई-सेवा केंद्रात आधारची नोंदणी होऊ शकते. नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचा फोटो, हाताचे ठसे, आयरिस यांची नोंद कम्प्युटरमध्ये करेल. तसेच तुमची माहितीही कम्प्युटरमध्ये नोंदविली जाईल. माहिती भरताना ती तपासून घ्या व आवश्यक दुरुस्त्या लगेच करून घ्या. सर्व अर्ज भरून झाल्यावर ही माहिती केंद्रीय सर्व्हरकडे पाठविली जाईल व त्याची पावती दिली जाईल. ही पावती सांभाळून ठेवणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण आयुष्यात आधार कार्डसाठी एकदाच नोंदणी करावी. वारंवार नोंदणी केली म्हणून नवीन कार्ड मिळणार नाही.
जर तुमचे आधार कार्ड हरवले :-
सर्वात आधी https://resident.uidai.gov.in संकेतस्थळावर जावून तुमच्या रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुमचा आधार कार्ड पुन्हा मिळवू शकता. महत्वाचे म्हणजे हरवलेला आधार कार्ड मिळवण्यासाठी एनरोल्मेंट प्रक्रियेमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आईडी रजिस्टर्ड करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला मोबाईल क्रमांक रजिस्टर करण्यात अडचणी निर्माण होत असतील आणि आधार कार्ड हरवला असेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. तेव्हा तुम्हाला तुमचा नविन मोबाईल क्रमांक देणे गरजेचे असेल आणि वन टाइम पासवर्डच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे आधार रिप्रिंट करता येणार आहे. या प्रक्रियेसाठी तुम्हाला ५० रूपये शूल्क मोजावे लागेल.
कसे कराल आधार कार्डला रिप्रिंट :-
१) https://resident.uidai.gov.in/order-reprint या संकेतस्थळाला भेट द्या.
२) आधार रिप्रिंट पर्यायावर क्लिक करा.
३) तुमचा आधार क्रमांक आणि अन्य माहिती भरा.
४) मोबाईल क्रमांक वेरिफिकेशन द्या.
५) ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर एसआरएन प्राप्त होईल.
६) आधार कार्ड तुमच्या राहत्या घरी पोहोचवले जाईल.
जर तुम्हाला आधार कार्ड संबंधित अधिक माहिती हवी असे, तर खालील संपर्क साधा.
-: तक्रारीसाठी संपर्क :-
टोल फ्री क्रमांक - १८००३००१९४७
फॅक्स ०८०-२३५३१९४७
पत्रव्यवहाराचा पत्ता- PO Box 1947, GPO Bangalore - 560001
इमेल- help@uidai.gov.in

0 Comments