Rajmudra IT | माहीती
गावाच्या ग्राम पंचायतीला विकास कामांसाठी वर्षभरात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून किती निधी मिळाला आणि तो गाव विकासाच्या कोणत्या कामांवर किती खर्च झाला याची सविस्तर माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाने यासंदर्भातील संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकतेस्थळावर देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही गावाला मिळालेल्या निधीची आणि खर्चाची इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतींचा कारभार अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
सध्या ग्राम पंचायतींना गावच्या विकासकामांसाठी केंद्र सरकारच्या चौदाव्या वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. तसेच राज्य सरकारच्या विविध विकास योजनांमधूनही भरपूर निधी उपलब्ध होत आहे. या निधीचा वापर गावच्या योग्य आणि मूलभूत विकास कामांसाठी होतो की नाही हा मुद्दा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा असतो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाने एक संकेतस्थळ विकसित केले आहे. http://www.planningonline.gov.in या संकेतस्थळावर देशातील प्रत्येक राज्य, राज्यांमधील जिल्हे आणि गावे यांची वर्षभरातील वित्तीय माहिती देण्यात आली आहे.

0 Comments